(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

विकिपीडिया:प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








विकिपीडियातील एखादा विशिष्ट विषय अथवा विषयसमुहांच्या व्यवस्थापनाकरिता नेमुन घेतलेल्या पानांच्या संकलनास,तसेच, त्याचवेळी ,विश्वकोशिय कामात सहयोग करण्याकरिता ती पाने वापरणारा संपादकांचा गटास विकिप्रकल्प असे म्हटले जाते.

विकिप्रकल्प प्रकल्पांतर्गत समाविष्ट लेखांचे लेखन, संपादन व त्यात काम करणार्‍या सदस्यांचा समन्वय आणि संघटीत करणारा स्रोत आहे ,परंतु प्रकल्प पान ही तीथेच विश्वकोशिय लेख लिहिण्याची जागा नाही.

त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचार विमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते.

स्वरूप

साधारणतः विविध विषयास अनुसरून दालन(पोर्टल) व त्यांवर आधारित प्रकल्प पाने असे स्वरूप इंग्रजी विकिपीडियावर आहे. मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विविध विषयांना अनुसरून वेगवेगळे प्रकल्प आणि दालने (पोर्टल) सुलभपणे कार्यान्वित व्हावीत म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने हे नवीन पान तयार केले आहे.

तसेच सुसूत्रीकरण सुलभ व्हावे म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प ही नवीन श्रेणी सुरू केली आहे.

उद्देश

बहुसंख्य सदस्य आपण सध्या मुख्यत्वे कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केले आहे हे सदस्यपानावर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्याशिवाय इतर सदस्य तुमच्या सदस्यपानावर येण्याची शक्यता कमी असते. त्याकरिता तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे हे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहण्यासाठी सोईचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर प्रस्तुत विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांत आपापसात सहमती साधणे सोपे होते. अशामुळे ठरवलेली काही निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून फूर्ण करता येतात.

वैयक्तिक प्रयत्‍नांना इतरांचीही मदत मिळावी आणि नवीन सदस्यांचा गोंधळ न उडता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पांत सहज सहभागी होता यावे म्हणून विकिपीडिया प्रकल्प हे एक छोटे पाऊल आहे. सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणतः मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहे.

प्रकल्प सहभाग

प्रकल्पात सह्भागी सदस्य संबधीत लेखात लेखन करणार्‍या सदस्यांना सहभाग नोंदवण्याकरिता आंमंत्रीत करू शकतात. संलग्न दालने,नवीन लेखांचे लेखन


वर नमुद केल्याप्रमाणे विकिपीडियातील सदस्यांना एखाद्या लेखात लेखन करण्याकरिता प्रकल्पाची निर्मिती किंवा सहभागी होणे बंधनकारक नसते पण सोईचे मात्र असते.

नवीन प्रकल्पांची सुरूवात

कोणत्याप्रकारचा प्रकल्प सुरू करावा अथवा करू नये असे विशिष्ट बंधने नाहीत. प्रकल्प तुम्ही एकट्याने तडीस नेणार असाल तर तसे करू शकता मात्र इतरांचा सकारात्मक सहभाग असेल तर सहभागी होण्यापासून थांबवू शकत नाही.

इतरांचा सहभाग मिळवायचा असेल तर प्रस्तावित प्रकल्पाचा येथे खाली उल्लेख करून सहभाग देण्यास इतर कुणी उत्सुक आहे का ते चाचपता येईल किंवा प्रकल्प सुरूही करून मागाहून इतर सदस्यांना निमंत्रित करता येईल.

प्रकल्पास एक निमंत्रणे देणारा व इतर सदस्यांशी संपर्क सदस्य व एक लेख समन्वयक असेल व त्यांचा स्वत:चा नियमीत सहभाग असेल तर प्रकल्पाच्या यशाची कमान चढती राहते.

नियोजित प्रकल्पाचे सर्वांना उमजेल रुचेल असे नाव निवडावे.

आधि प्रकल्पाचे मुख्यपान बनवावे. मुख्य पानावर शिर्षस्थानी प्रकल्पसाचा, प्रकल्पातील उपपाने नियंत्रित करण्याकरिता उजवीकडे मार्गक्रमण साचा लावावा. आराखड्यात दिल्या प्रमाणे सदस्य चौकट साचे, निमंत्रण साचे, स्वागत साचे, लेखातील चर्चा पानावर लावण्याकरिता चर्चापान साचे,लेखात लावण्य़ाकरिता माहिती चौकट साचे आवश्यकते प्रमाणे बनवून ठेवावेत. उपलब्ध वर्गीकरणे,लेख,साचे व प्रस्तावित वर्गीकरणे,लेख,साचे यांची जंत्री उपलब्ध करावी.

आराखडे सोईकरता उपलब्ध केले आहेत बंधनकारक नसुन तुम्ही तुमच्या प्रकल्पाचे काम भिन्नप्रकारे तडीस नेऊ शकता.

दालने आणि लेखातील चर्चा पानावर लावलेल्या साचातून प्रकल्पास बरेच नवे योगदान उत्सूक सभासद मिळू शकतात तसेच संबंधीत लेखाच्या इतिहासातून आधी लेखन केलेल्या किंवा लेखन करत असलेल्या सदस्यांचा अंदाजा येतो.त्यांच्या चर्चा पानावर निमंत्रण देता येते. सभासदांची सदस्य पानावरील सदस्य चौकटीवरून सुद्धा बरेच सदस्य प्रकल्पांकडे आकर्षित होतात.

प्रकल्प पानांचे आराखडा

इतर तयार करावयाचे आराखडा साचे:


तयार साचे

नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव

  1. ...

प्रकल्पात रूपांतरीत करावयाचे वर्ग आणि साचे

  1. वर्ग:Helpdesk
  2. वर्ग:सदस्यचौकट साचे

मध्यवर्ती प्रकल्प समन्वय

विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.

गट

  • विषयवार लेख प्रकल्प गट
  • समन्वय आणि प्रगती विषयक लेखगट
  • विकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट
  • मध्यवर्ती चर्चागट
  • वरील गटातील उपपाने
  • प्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट

मध्यवर्ती प्रकल्प समन्वयात सहभागी सदस्य

  1. Mahitgar ०५:४९, २१ जुलै २००९ (UTC)
  2. ...

कार्यान्वित प्रकल्प

  • विकिपीडिया:निर्वाह हा प्रकल्प किमान आवश्यक, प्रमुख, मह्त्वपूर्ण कामे कशी करावीत आणि तसेच् मुखपृष्ठ ताजेतवाने ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि पाठबळ पुरवते.
मुखपृष्ठ/धूळपाटी
मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प
विकिपीडिया:दिनविशेष प्रक्ल्प
जानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर

धूळपाटी

प्रस्तावित प्रकल्प

विकिपीडिया इतर निर्वाह

विकिपीडिया:शुद्धलेखन
क्लीन अप
विकिकरण
समसमीक्षा (पिअर रिव्यू)
{{Template:समसमीक्षा}}
Category:समसमीक्षण
उद्देश: सदस्यवृद्धी

विकिपीडियासाठी विविध दालने (पोर्टल) कार्यान्वित करण्याकरिता प्रकल्प

कार्यान्वित दालन

प्रस्तावित दालन

विकिपीडिया:नवी दालने


अपूर्ण प्रकल्प इकडे लक्ष द्या

  1. विकिपीडिया:ओळख
  2. विकिपीडिया:अपूर्ण लेख
  3. विकिपीडिया:आपणास माहित आहे का?
  4. विकिपीडिया:कसेकरायचे
  5. विकिपीडिया:गुप्तता नीती

वगळावयाची पाने

{{निर्मितीसंदर्भहवा}} साचा एखाद्या पानास वर्ग:विकिपीडिया नामविश्वातील निर्मितीसंदर्भ स्पष्ट नसलेली पाने येथे वर्गीकृत करतो.
{{प्रकल्पपानकाढा}} साचा एखाद्या पानास वर्ग:विकिपीडिया नामविश्वातील पानेकाढा विनंती येथे वर्गीकृत करतो.
{{ऐतिहासिकसंदर्भपाने}} साचा एखाद्या पानास वर्ग:विकिपीडिया नामविश्वातील ऐतिहासिकसंदर्भपाने येथे वर्गीकृत करतो.

अनित्य प्रकल्प

विक्शनरी सहप्रकल्प

मराठी विक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. इंग्रजी विकिपीडियावर १५ लाखाहून अधिक लेख उपलब्ध आहेत. ते मराठी भाषेत रूपांतरित करता येऊ शकतात. या मोठ्या प्रमाणावर लागणार्‍या भाषांतरणांकरिता विक्शनरी प्रकल्प एक आधारस्तंभ आहे.

विक्शनरी हा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्दकोश प्रकल्प आहे. विकि प्रणालीतील सोपे सुचालन आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने वर्गीकरणांच्या हाताळणीची क्षमता अद्वितीय स्वरूपाचे आंतरजालीय शब्दकोश-निर्मितीची जनक ठरू शकते. याद्वारे मराठी भाषेच्या अभ्यासकांना सोप्या तंत्राचा आणि सामान्य जिज्ञासूंकरिता * शब्दक्रीडा दालन विक्शनरीसारख्या सुविधेचा लाभ झाला आहे.

विक्शनरी प्रकल्पात आपले सदस्य खाते नसेल तर तुम्हाला ते Log in / create account येथे उघडता येते. विक्शनरी प्रकल्पात योगदान करू इच्छिणार्‍यांच्या सोईसाठी *नमुना लेख *विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम वर्गीकरण आणि भाषा अभ्यास प्रकल्प,आणि * शब्दक्रीडा दालन विक्शनरी उपलब्ध करण्यात आले आहे.

हा प्रकल्प अजून बाल्यावस्थेत आणि सर्व मराठीप्रेमींकडून योगदानाच्या प्रतीक्षेत आहे.

मराठी विक्शनरी आणि मराठी विकिपीडिया आंतरविकि दुवे

  • मराठी विक्शनरी लेखाचा दुवा विकिपीडियावर [[wikt:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
  • मराठी विकिपीडियाचा दुवा मराठी विक्शनरीत [[w:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
  • wikt:mr: , w:mr: इत्यादीसाठी वरीलप्रमाणे फक्त आंतरविकि दुव्यांनाच वापरावे; विक्शनरीतील लेखांना विक्शनरीतल्या विक्शनरीत परस्पर सांधणी करताना असा दुवा वापरू नये.
  • आपल्याला मराठी विक्शनरीच्या संदर्भात एखादा उपयुक्त लेख मराठी विकिपीडियावर आढळल्यास {{विक्शनरीविहार}}हा साचा महिरपी कंस आणि त्यातील शब्दांची अस्सल नक्कल करून, संबधित मराठी विकिपीडिया लेखात चिटकवावा.

हेसुद्धा पहा

मराठी भाषेतील 'विकिबुक्स'सहप्रकल्प

मराठी भाषेतील 'मराठी विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. 'विकिबुक्स' ही एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिबुक्स'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या २१ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

लेखक:बहिणाबाई चौधरी.मिलिन्द भांडारकर

विकिकॉमन्स समाईक भांडार येथे मराठी भाषेतील मुखपृष्ठ(दालन)

विकिकॉमन्स हे मुक्त संचिकांचे समाईक भांडार आहे. यातील संचिका विकिपीडियाच्या सर्व भाषिक सहप्रकल्पात वापरता येतात.विकिकॉमन्स येथे प्रत्येक भाषेतील मुखपृष्ठ(दालन) आहे. तसेच साहाय्य पाने आहेत .

विकिकॉमन्स येथे असेच मराठी मुखपृष्ठ(दालन) आणि Category:Commons-mr बनवण्यात सर्व मराठी विकिकरांचे योगदान हवे आहे. .धूळपाटीपाहा.

At Wiki Commons मुखपृष्ठ, Marathi Language portal page मुखपृष्ठ is under construction at sandbox.This Marathi Language portal page is also proposed to support commons:Category:Maharashtra and marathi translation of relevant various help pages in category Commons:Category:Commons-mr.
To get support from Marathi Language Wikipedians this page has been linked here at Marathi Langauge Wikipedia Project page.

इंग्रजी विकिपीडियात महाराष्ट्र दालन

महाराष्ट्र पोर्टल हे इंग्लिश विकिपीडियात महाराष्ट्र विषयक दालन आहे. ह्या दालनाची व्यवस्था विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र या प्रकल्पातील सहभागी सदस्य पाहतात.

युजर एम आर ही इंग्रजी विकिपीडियातील मराठीभाषक व्यक्तींची युजर कॅटेगरी आहे.Category: Contributors to the Marathi Wikipedia, User mr, User Devaया इंग्रजी विकिपीडियात मराठी सदस्यांशी संबंधित काही इतर श्रेणी आहेत.

इंग्रजी विकिपीडियातील मराठी सदस्यांकरिता सदस्यपानावर तसेच चर्चापानावर लावण्याकरिता दोन साचे उपलब्ध आहेत.{{User_interwiki_infoboard_mr}};{{User wikimr}}.

धूळपाट्यांची यादी

लेख बदलताना कच्च्या स्वरूपात [[धूळपाटी/(संबधित लेखाचे नाव)]] अशा स्वरूपात साठवता येतात.