(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

विकिपीडिया:चावडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया समाज

मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी.मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात.जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा.खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.

विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.

  • विकिपीडिया समाज कसा आहे.

विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर

  1. संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
  2. फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
  3. विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.

वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.

  • विकिपीडिया समाज काय नाही.
    • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
    • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
    • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
    • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.




चर्चेचे स्थानांतरण

नमस्कार ,

मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.

वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.

चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.

आपला नम्र

माहितगार (चर्चा) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST)[reply]

प्रोजेक्ट टायगर अभियान आणि स्पर्धा नियोजन व शोध बोध बैठक

सादर नमस्कार! मराठी विकीपीडियाची प्रतिनिधी म्हणून प्रोजेक्ट टायगर संदर्भात होत असलेल्या बैठकीसाठी मला आमंत्रण मिळाले आहे. CIS कडून मला अधिकृतपणे यासाठी बोलविण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ही लिंक पहावी. https://meta.wikimedia.org/wiki/Project_Tiger_Community_Consultation या बैठकीसाठी पूर्व अभ्यास म्हणून प्रत्येक सहभागी व्यक्तीला पाच मिनीटे निवेदन करण्याची संधी देण्यात येईल. त्यामधे आपापल्या भाषिक समूहाचा टायगर उपक्रमातील सहभाग, आयोजनातील बलस्थाने आणि आव्हाने याविषयीही मांडणी करावयाची आहे. आपली मते येथे नोंदवल्यास महा योग्य आणि औचित्यपूर्ण मुद्द्यांचा समावेश माझ्या मांडणीत करता येऊ शकेल.सहकार्याच्या अपेक्षेत!आर्या जोशी (चर्चा) १४:५८, २४ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]