(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

विकिपीडिया:कौल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या पाना संबंधीच्या उपपानांचे दुवे उजवीकडील सुचालानात पहावेत. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎ मुखपृष्ठ सदर लेखासंबधीचे कौल घेतले जातात. विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे प्रचालक पदाचे कौल घेतले जातात. इतर कौल येथे खाली घ्यावेत.

हे पान मराठी विकिपीडियावरील सर्व सदस्यांचा सर्वसाधारण कौल अजमावण्या करीता आहे. कौलांमध्ये सुस्पष्ट आणि संक्षिप्त पण नेमके प्रश्न असावेत आणि सोबत नेमक्या पर्यायांचा संच असावा. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.





दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव

कौल प्रक्रिया मुदत

पार्श्वभूमी

सध्या मराठी विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत आहेत -

०. चर्चा पानांवर किंवा इतरत्र सदस्यांमध्ये चर्चा होते, त्यातून असलेल्या धोरण किंवा संकेतांपेक्षा वेगळे धोरण/संकेत करण्याची कल्पना पुढे येते.

  1. ध्येय आणि धोरणे चावडीवर (या पानावर) अधिकृतरीत्या चर्चा सुरू होते.
  2. या पानावर, याच्या उपपानावर किंवा कौलपानावर रीतसर प्रस्ताव मांडला जातो.
  3. तेथे चर्चा चालू राहते त्याचबरोबर कौल देणेही सुरू होते.
  4. चर्चेचा ओघ कमी झाल्यावर प्रचालक कौलासाठी मुदत देतात.
  5. मुदत संपल्यावर कौलमोजणी होऊन त्यातील अवैध कौल वगळले जाताता.
  6. निकाल जाहीर होतो.

यातील ० आणि १ हे नेहमी होतेच असे नाही.

या प्रक्रियेत अनेकदा कौल घेण्यास उशीर होतो वर कौल नेमका कधी संपेल हे वरकरणी लक्षात येत नाही. पूर्वी मराठी विकिपीडियावरील संपादकांची संख्या कमी असताना असे असणे योग्य होते, किंबहुना स्वागतार्ह होते कारण अशा दीर्घ मुदतीमुळे क्वचित काम करणाऱ्या सदस्यांनाही त्यांचा कौल देण्याची संधी मिळत असे. आता सुदैवाने येथील संपादकसंख्या वाढली आहे व धोरणे ठरविणे तसेच इतर कौल घेणे शक्य तितक्या लवकर (पण निष्पक्षपातीपणे) पार पडणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अधिक योग्य आहे.

असे असता वरील प्रक्रिया किंचित बदलली जावी व त्याला ठाम मुदत मिळावी यासाठी मी खालील प्रस्ताव मांडत आहे.

प्रस्तावित प्रक्रियेनुसार कोणताही कौल कमीतकमी २१ दिवस चालू राहील. असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल. याच बरोबर कोणताही कौल जास्तीतजास्त ३५ दिवस चालू राहील.

अभय नातू (चर्चा) ०२:१९, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

प्रस्ताव

विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत पाळले जातील -

१ कोणताही कौल घेण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे प्रस्ताव मांडला जावा.

१.१ उत्पात आणि खोडसाळ प्रस्ताव प्रचालक काढून टाकतील. इतर सदस्यांनी येथे फेरफार करू नये.

२ अपूर्ण, असंबद्ध किंवा अर्थबोध न होणारे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलविले जातील.

२.१ इतर सदस्यांनी प्रस्तावात फेरफार करू नये.

३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.

४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.

५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.

६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.

चर्चा