तुंगभद्रा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १७:३५, २ मे २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
तुंगभद्रा नदी
हंपी येथे तुंगभद्रेचे पात्र
उगम कुडली, शिमोगा जिल्हा (तुंगा नदी व भद्रा नदीच्या संगमावर)
मुख कृष्णा नदी, आलमपूर, महबूबनगर जिल्हा
पाणलोट क्षेत्रामधील देश कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश
लांबी ५३१ किमी (३३० मैल)
उगम स्थान उंची ६१० मी (२,००० फूट)

तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. शिमोगा जिल्ह्याच्या कुडली ह्या गावाजवळ तुंगाभद्रा ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन तेलंगणाआंध्र प्रदेश राज्यांची अंशतः सीमा आखते व कृष्णा नदीला मिळते. हरिहर, हंपी, हॉस्पेट, मंत्रालयम, कुर्नूल ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.