(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

रुबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुबाई हा मूळ अरबी भाषेतील स्फुट कवितेचा काव्यप्रकार असून, कवी माधव जूलियन यांना सर्वप्रथम मराठीत आणला. त्यांच्यानंतर गो.गो. अधिकारी, ज.के. उपाध्ये यांनीही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणल्या आहेत.

कवी कांत, शांता शेळके, प्रफुल्लदत्त, श्रीकृष्ण पोवळे, वा.न. सरदेसाई, रॉय किणीकर यांनीही रुबाया हा काव्यप्रकार हाताळला आहे.

माधव जूलियन यांचे रुबायासंग्रह[संपादन]

  • उमर खय्यामकृत रुबाया (१९२९). मूळ फार्सी भाषेतील रुबायांचा हा मराठी अनुवाद आहे.
  • द्राक्षकन्या (१९३१) : ’फिट्‌सझेरल्ड’ने उमर खय्यामच्या रुबायांच्या इंग्रजी भाषांतरावरून केलेला मराठी अनुवाद.
  • मधुलहरी (१९४१) : उमर खय्यामच्या ’फिट्‌सझेरल्ड’ने निवडलेल्या रुबायांचा, पण मूळ फारसीवरून माधव जूलियन यांनी मराठीत केलेला अनुवाद..