(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

सुशील कुमार मोदी

भारतीय राजकारणी

सुशील कुमार मोदी (५ जानेवारी, १९५२ - १४ मे, २०२४) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणीबिहार या राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री होते. पाटणा शहरामध्ये जन्मलेले व शिक्षण घेतलेले मोदी रा.स्व. संघाचे आजन्म सदस्य होते. १९९० साली मोदींनी राजकारणात कार्यरत राहण्यास सुरुवात केली. ते १९९०, १९९५ व २००० साली बिहार विधानसभेवर निवडून गेले.

सुशील कुमार मोदी

बिहारचे उपमुख्यमंत्री
कार्यकाळ
नोव्हेंबर २००५ – जून २०१३
मुख्यमंत्री नितीश कुमार

कार्यकाळ
२००४ – २००९

जन्म ५ जानेवारी १९५२ (1952-01-05)
पाटणा
मृत्यू १३ मे, २०२४ (वय ७२)[१]
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी जेसी मोदी
धर्म हिंदू

२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी भागलपूर मतदारसंघामधून निवडून आले. परंतु केवळ एक वर्ष संसद सदस्य राहिल्यानंतर मोदींनी २००५ साली खासदारपदाचा राजीनामा दिला व ते बिहारमध्ये परतले. २००५ ते २०१३ दरम्यान ते नितीश कुमार राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदावर होते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते मानण्यात येत होते एन.डी.ए.ला बहुमत मिळाल्यास मोदींना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली गेली होती. परंतु ह्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यास भाजपला अपयश आले.

१३ मे २०२४ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते.[१]

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ a b "बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". दैनिक लोकमत. १४ मे २०२४ रोजी पाहिले.