(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

"वर्ग:अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
अर्थशास्त्र नावाचा स्वतंत्र लेख बनविला
 
ओळ १: ओळ १:
[[Category:अर्थव्यवस्था]]
==माणसांच्या अर्थार्जनामागचे अर्थ==
[[Category:व्यापार]]

[[Category:पद्धतशीर अभ्यास]]


धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष ही माणसाच्या आयुष्यात चार मोलाची साध्ये --चार पुरुषार्थ-- वैदिक धर्मग्रंथांमधे नमूद आहेत.


"जोडुनियां धन उत्तम व्यवहारे । उदार विचारें खर्च करी ।" असेही संत तुकारामांनी आपल्या एका अभंगात अर्थार्जनासंबंधात म्हटलेले आहे.


सद्यःच्या जगात बहुतेक पुरुष आणि बर्याच स्त्रिया आपल्या आयुष्यातली सुमारे ४५ वर्षे दर आठवड्यातले सुमारे ४५ तास --अर्थात काहीजण कमी काळ, काहीजण जास्त काळ-- अर्थार्जनाच्या उद्योगात व्यतित करतात. शिवाय बहुतेक सगळेजण आपापल्या कुवतींनुसार जास्तीत जास्त पैसे कमावण्याचाही प्रयत्न करत असतात. कमाई जितकी जास्त तितका आपल्या आयुष्यातला आनंद जास्त अशी एक अंधुक कल्पना बहुतेक सगळ्या माणसांच्या मनात पार्श्वभूमीवर ठाणे मांडून असते. पण वस्तुस्थिती अशी असते की जास्त जास्तीत जास्त पैसे कमावण्याच्या आपल्या प्रयत्नांमागे आपली उद्दिष्टे नेमकी काय आहेत ह्या गोष्टीचा विचार फार थोड्या लोकांनी केलेला असतो.


पैसे कमावण्यातून ज्या गोष्टी माणसे सर्वसाधारणपणे मिळवू शकतात वा करू शकतात त्या गोष्टींची यादी खाली दिली आहे. यादीतल्या काहीकाही बाबी जवळजवळ सगळ्या माणसांना सामाईक आहेत, तर उरलेल्यांपैकी काही फक्त काही माणसांना जास्तीत जास्त अर्थार्जनाकरता अधिक प्रेरणा देतात. यादीतल्या शेवटच्या तीन बाबी माणसाच्या आयुष्यात सुखसमाधान न आणता उलट त्याच्या सुखसमाधानाच्या आड येतात.



यादी अशी :


* वर्तमान आणि भविष्यकाळातली आपली स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची शारीरिक सुरक्षा/स्वास्थ्य आणि मनःस्वास्थ्य

(शारीरिक सुरक्षा/स्वास्थ्य आणि किमान मनःस्वास्थ्य कमावण्याचे मार्ग म्हणजे अन्न, कपडे, निवारा, वैद्यकी मदत/उपचार,
[सरकारी करभरण्यांद्वारे] पोलिस आणि लष्करी संरक्षण, कदाचित पहारेकरी वापरुन आणखी वैयक्तिक संरक्षण, आणि फर्निचर, टीव्ही, भांडीकुंडी, रेफ्रिजरेटर, वगैरे जंगम मालमत्ता ह्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता)


* स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे (विशेषतः मुलांचे) शाळाकॉलेजी शिक्षण (ह्या शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणानंतर अर्थार्जन!)


* आयुर्विमा; मालमत्ता, वैद्यकी उपचार वगैरेंसंबंधी विमे


* स्कूटर, मोटार, बस, टॅक्सी, रेल्वे, विमाने ह्या वाहनांची सुविधा


* मोबिल फोन, टेलिफोन ह्या दूरसंपर्कांच्या सुविधा


* सांस्कृतिक/मनोरंजनात्मक उद्योग / छंद : प्रवास, यात्रा, संमेलने, टीव्ही-चित्रपट-नाटके, खेळ सहभाग/प्रेक्षण, वाचन, इंटरनेटचा उपयोग, इतर छंद


* वित्तवर्धनार्थ पैशांची गुंतवणूक


* दानधर्म


* समाजसेवा


* वस्तूंच्या आप्तेष्टांना भेटी


* पैसे कमावण्यात यशस्वी होण्याने वाटणारे समाधान


* विपुल पैसे (त्यांचा उपयोग नसला तरी) गाठीशी असल्याचा आनंद


* परावलंबित्वाचा अभाव


* अनिवार्यपणे दुसर्यांच्या कह्यात रहाण्याच्या शक्यतेचा अभाव




* दुसर्यांवर सत्ता गाजवून स्वतःची सत्ता आणि पुंजी अधिकाधिक वाढवण्याची सुविधा


* अनिर्बंध भौतिक उपभोग, ऐषआराम


* आपल्या आर्थिक सुबत्तेचे (आणि काही वेळा "दानधर्मा"चे) प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रदर्शन करत राहून इतरांच्या मनात हेवा, असूया, दरारा निर्माण करण्याची आणि त्याद्वारे स्वपूजा वाढवत रहाण्याची सुविधा

२३:३२, २८ मार्च २००६ ची नवीनतम आवृत्ती

उपवर्ग

एकूण २४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २४ उपवर्ग आहेत.

"अर्थशास्त्र" वर्गातील लेख

एकूण १३२ पैकी खालील १३२ पाने या वर्गात आहेत.