(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

फ्लॉरेन्स नाइटिंगेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
जन्म १२ मे १८२० (1820-05-12)
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू १३ ऑगस्ट, १९१० (वय ९०)
पार्क लेन, लंडन, युनायटेड किंग्डम
पेशा परिचारिकासंख्याशास्त्रज्ञ
प्रसिद्ध कामे परिचारिका व्यवसायाला आधुनिक स्वरूप आणले
ख्याती रुग्णालय स्वच्छता, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद
पुरस्कार रॉयल रेड क्रॉस (१८८३), ऑर्डर ऑफ मेरीट (कॉमनवेल्थ) (१९०७)
स्वाक्षरी

फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.[१]

संख्याशास्त्र आणि स्वच्छताविषयक काम

नाइटिंगेल रोझ प्लॉट

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला.

नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ शहाणे, क्षिप्रा (२०००). दिनमहात्म्य. पुणे: उन्मेष प्रकाशन. pp. ८६-८७.