(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

दत्तात्रेय गणेश सारोळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
दत्तात्रेय गणेश सारोळकर
राष्ट्रीयत्व भारतीय

दत्तात्रेय गणेश सारोळकर ( :इ.स.१८९४; - १९३४) हे एक मराठी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि राजकीय व सामाजिक स्वरूपाचे वैचारिक लेखन करणारे लेखक होते. ते मौज वर्तमानपत्राचे काही काळ संपादकही होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, व सामाजिक अशी एकूण बारा नाटके लिहिली. त्यांची नाटके मनोहर स्त्रीसंगीत मंडळी आणि नाट्यकलाप्रसारक मंडळी या नाट्यसंस्थांनी रंगभूमीवर आणली होती. नाटकांखेरीज, दत्तात्रेय सारोळकरांनी काही अन्य पुस्तकेही लिहिली आहेत.

ग्रंथाचे नाव प्रकार प्रसिद्धी वर्ष
आमचा समाज व समाजशास्त्र वैचारिक ग्रंथ
एकादशी लघुकथासंग्रह
जनता-जनार्दन सामाजिक कल्पनारम्य नाटक १९२२
दर्यादौलत ऐतिहासिक नाटक १९२९
दर्यासारंग ऐतिहासिक नाटक १९२९
देहान्त प्रायश्चित्त सामाजिक कल्पनारम्य नाटक १९२८
पदवीधर सामाजिक व कल्पनारम्य नाटक १९३२
पराक्रमाचा पाया ऐतिहासिक नाटक १९२९
पेशव्यांचा पेशवा ऐतिहासिक संगीत नाटक १९२५
भारतमातेची श्रेष्ठता अर्थात मिस मेयोच्या असत्य विधानांचे खंडन वैचारिक १९२८
मराठीची पाईकी संकीर्ण
रंगेल राजकुमार कादंबरी १९२८
राजांचा राजा पौराणिक नाटक १९३०
वीर सौभद्र गद्यपद्यात्मक पौराणिक नाटक १९२९
शुभमंगल सामाजिक नाटक १९२९
श्रीमंताची पोर कादंबरी
सतीचा हंबरडा कादंबरी १९२९
सम्राटाचा सूड सामाजिक कल्पनारम्य नाटक १९३०
सुधारलेले विवाहशास्त्र वैचारिक ग्रंथ
स्वातंत्र्याच्या कहाण्या राजकीय